धनगांव ग्राम

1945–46 ला संपूर्ण भारतात प्रचंड मोठा दुष्काळ पडला अनेक ठिकाणचे लोक भुके कंगाल झाली फार मोठी वित्त आणि जिवीत हानी झाली. त्याचवेळी सरकारने हुकुम सोडला की प्रत्येक शेतकयाने यावेळी ज्यादा लेव्ही धान्य दयाव्यात त्याप्रमाणे शेतकयांनी पेठयात ठेवलेले धान्य सरकारला देण्यास सुरुवात केली. भिलवडीच्या ऐतिहासिक घाटावर प्रत्येक गावांनी आपआपले धान्य जमा केले. भिलवडी तसेच त्याखालील 12 वाडयानीही आपले धान्याचे ढीग तयार केले. त्याचदरम्यान गावचे जेष्ठ साहित्यीक म.भा.भोसले हे भिलवडीच्या शाळेत शिक्षक होते ते तिथे गेले त्यांनी पाहिले की इतर गावापेक्षा तावदरवाडी गावने भरपूर धान्य जमा केले.