ग्रामदैवत

ग्रामदैवत–

धनगांव नगरीचे आराध्य ग्रामदैवत म्हणून प्राचीन हनुमानाचे मंदीर असून या मंदिरासंदर्भात अशी अख्यायिका सांगितली जाते की सदर हनुमानाची मुर्ती ही नदीनात्रातून कापसाच्या बोथातून वाहत आली असून ती नदीकाठी सापडल्याने गावकयांनी तेथेच हनुमान मंदीराची स्थापना केली. नंतरच्या गावकयांनी हे मंदिर अन्य ठिकाणी हालवले व ग्रामस्थांच्या मदतीने कौलारु छप्पर वजा मंदीर बांधले सदर मंदिराचे सन 2005 मध्ये गावातील प्रतिष्ठीत नागरिक आबा नाना सावंत व सहकार मंत्री मा. पतंगरावजी कदम साहेब यांच्या संयुक्त सहकार्याने जिर्णोध्दार करण्यात आला असून या मंदीरामध्ये भव्य सभा मंडप व मंदिराच्या शिखराचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

या ग्रामदैवताची यात्रा प्रतिवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमान जयंती मोठया उत्साहात साजरी केली जाते. यावेळी श्रीं ची संपूर्ण गावातून भव्य पालखी निघते व मोठया प्रमाणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते व या यात्रेनिमित्त अगोदर आठ दिवस संत ज्ञानेश्वरीचे पारायण सोहळा साजरा करण्यात येतो. हा सप्ताह रामनवमी पासून सुरु होऊन हनुमान जयंतीला सांगता होते. या मंदिराच्या पुजेचे काम भुवनेश्वरवाडी येथील गुरव यांचेकडे आहे.

ग्रामदैवत असणारी हनुमानाची मुर्ती ही अखंड दगडातील कोरीव स्वरुपाची असून अशी मुर्ती अन्य कोठेही नाही सदर ग्रामदैवत हे जागृत असून नवसाला पावणारा आहे म्हणून सर्व परिसरात या ग्रामदैवताची ख्याती प्रसिद्ध आहे.