पुरस्कार

पुरस्कार–

  • धनगांव गावाला सन 1995–96 साली ग्रामअभियान योजनेअंतर्गत दुसया क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे गाव निर्मलग्राम बक्षिसासाठी पात्र झाले आहे महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान गावात उत्कृष्ठ प्रकारे राबविले आहे. नागरिकांची आपआपसातील भांडणे जुन्या केसेस समझोत्याने मिटविण्यात आली त्यामुळे पोलीस स्टेशनकडे जाणाया नागरिकांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. परिणामी तंटामुक्त अभियान चांगल्याप्रकारे राबविल्याबद्दल गाव तंटामुक्त बक्षीसासाठी पात्र झालेले आहे.
  • एक गाव एक गणपती स्पर्धेत गावाने हिरहिरीने भाग घेतला गावात सुरुवातीला दहा ठिकाणी गणपती बसविला जात असे त्यातून चुरस निर्माण होऊन मंडळातील युवकामध्ये भांडणे होत असत. त्यामुळे एक गाव एक गणपती स्पर्धेत भाग घेऊन गावात एकच गणपती बसवण्यात आला त्यामुळे गावात एकोप्याचे वातावरण निर्माण झाले गणेशोत्सवात चांगले सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने कथाकथन नाटके इ. विविध उपक्रम राबविण्यात येतात.
  • साहित्यभुषण म.भा.भोसले सार्वजनिक वाचनालय धनगांव व धनगांव ग्रामस्थामाफर्त धनगाव गावचे सुपुत्र व कृष्णकाठची जेष्ठ साहित्यिक म.भा.भोसले राज्यस्तरिय पुरस्कार गेली सात वर्षे अविरतपणे चालू आहे.