इतिहास

इतिहास–

कृष्णा नदीच्या काठावर धनगांव(तावदरवाडी) हे गाव वसलेले आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या धनगावची संपूर्ण शेती बागायती पिकाऊ आहे. द्वापरयुगात पंचकृष्ण अवतारापैकी तिवरा अवतारी पुरुष श्री. गोविंदप्रभु हे दक्षिणेत धर्मप्रचारासाठी पदभ्रमण करीत असताना त्यांनी धनगावच्या या भूमीत काही काळ वास्तव्य केले पुढे दक्षिणेत जायची इच्छा न झाल्याने ते तसेच मागे फिरले मागे जाताना त्यांनी त्यांच्या जवळचे काही अवशेष धनगावच्या भूमीत ठेवले. त्याच अवशेषाची जपणूक श्रीकृष्ण मठाच्या रुपाने गावक-यांनी केली आहे.

चार पाचशे वर्षापुर्वी नदीकाठावर श्री. गोविंद प्रभुनी आणलेल्या अवशेषाचे सुरुवातीला काळा मठ आणि तांबडा मठ असे दोन मठ बांधण्यात आले होते. पुढे सततच्या महापुराच्या भीतीने गावकयांनी दोन्ही मठाचा मिळून एकच सुसज्ज असा मठ गावाच्या पुर्वेकडे बुरुंगवाडी रस्त्याजवळ बांधला गावच्या खोतानी त्या मठासाठी 6 ते 7 एकर जमीन ही दिली अशा उत्तम पध्दतीने महानुभाव पंथाची जपणूक गावकयांनी ठेवली आहे. दक्षिण भारतातले महानुभावाचे शेवटचे मांडलिक स्थान म्हणून धनगावचा उल्लेख केला जातो.

गावात सर्वात जुने रहिवासी सालुंखे(तावदर)कुटुंबीय आहेत. पैकी सालुंखे यांच्या काही घराण्याकडे खोतकी म्हणजे पाटीलकी आलेली होती तेच गावचा सर्व गावगाडा हाकीत होते कालांतराने तावदर कुटुंबीयांनी आपले आपले आडनाव सालुंखे असे करविले गावात सालुंखे, खोत पाटील माने तावदर रोकडे भोसले हिरुगडे पवार शेळके शिंदे सुर्यवंशी जामदारे सव्वाशे भगत–पाटील सावंत मोहिते फेवळे जाधव किरमे मास्ते मोरे आदी आडनाव असलेली कुटुंबीय आहेत.

पूर्वी 12 वाडयांची मिळून भिलवडी ही एकच ग्रामपंचायत होती. त्यामध्येच धनगांव(तावदरवाडी) या गावाचा समावेश होतो पुढे लोकसंख्या वाढल्यानंतर प्रशासनाच्या सोयीसाठी व गावाच्या सोईसाठी भिलवडी ग्रामपंचायतीमधून धनगाव ची स्वतंत्र ग्रामपंचायत दिनांक 11/6/66 रोजी स्वतंत्र करण्यात आली. धनगांव गावाची लोकसंख्या 2 हजार 394 आहे गावामध्ये कृष्णा नदी वाहत असल्यामुळे सुंदर स्वरुप प्राप्त झाले आहे तसेच गावाला साजेशी वेश आहे.