उत्पादनाची साधने
उत्पादनाची साधने–
- गावात मुख्य उत्पादनाचे साधन शेती हेच आहे.
- या शेतीमध्ये पारंपारिक पिकांबरोबर ऊस सोयाबीन गहू भात हरभरा इ. पिके घेतली जातात.
- फळबागावरही शेतकरी भर देत आहे.
- या शेतीतून मिळणाया पिकाच्या उत्पादनावर शेतकरी उपजिविका करीत आहे.
- दुग्ध व्यवसाय हा शेतीवर आधारित असल्यामुळे तो मोठया प्रमाणात केला जात आहे. दुधाचे बील हे दर पंधरा दिवसाला होत असल्यामुळे शेतकरी या व्यवसायावर भर देत आहेत.
- अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण कुक्कुटपालन व्यवसाय करत आहेत.
- गावामध्ये 10 किराणा मालाची दुकाने आहेत.
- गावामध्ये एक वेल्डींग वर्कशॉप आहे. गांडूळखत प्रकल्पही गावात आहे.