रोजगाराची उपलब्धता

शेती–

  • गावातील प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेतीला प्रामुख्याने पाणी कृष्णा नदीवर केलेल्या हनुमान लिफ्ट एरिगेशनच्या माध्यमातून मिळते तसेच काही शेतकयांनी स्वत:ची पाईप लाईन करुन शेतीसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे. नदीकडील भाग समृद्ध असा झाला आहे. नदीचे पाणी कमी झाल्यानंतर कोयना धरणातून पाणी सोडले जाते त्यामुळे शेतीला पाणी मिळू लागले आहे. त्यामुळे तावदरवाडी हे गाव समृद्ध बनले आहे.
  • आज तावदरवाडी हे गाव हिरवेगार आणि धनधान्याने समृद्ध आहे शेतीमध्ये ऊस सोयाबीन ज्वारी गहू भात कांदे पालेभाज्या ही प्रमुख पिके घेतली जातात. तावदरवाडी गावामध्ये दुग्ध व्यवसाय तरुण प्रामुख्याने करत आहे.