व्यक्तिमत्वे

वैशिष्टपूर्ण व्यक्तिमत्वे–

कै. म. भा. भोसले–

कृष्णाकाठाने महाराष्ट्राला विविध क्षेत्रातील मौल्यवान ‘धन– भरभरुन दिले आहे. मराठी मनांनाही या धनाचा स्विकार करुन आपले आयुष्य अधिक समृद्ध केल आहे कृष्णा काठच्या धनगावाने महाराष्ट्राला मराठी वाड्याला म भा भोसले गुरुजीच्या रुपाने असेच समृद्ध धन दिले आहे. या धनरुपी साहित्याने महराष्ट्राचे ग्रामीण मराठी साहित्यामध्ये भोसले गुरुजींच स्थान यादृष्टीने एक मानदंड या नात्याचे आहे.

म. भा. भोसले गुरुजींचा जन्म 15 जुलै 1914 चा घरची परिस्थीती तशी बेताचीच पण आत्मविश्वासाच्या जोरावर सातवीपर्यंतचे शिक्षण घेवून गुरुजी प्राथमिक शिक्षक झाले. सातवीपर्यंत शिकलेल्या गुरुजींना लिहिलेल्या वाड्:मयावर आज बरेचजण एम फिल झाले आहेत. यावरुन गुरुजींच्या वाड्:मयाची उंची समजून येते. ग्रामीण साहित्यात वेगळे स्थान निर्माण करणाया भोसले गुरुजींची 1936 मध्ये ‘आजोबांची डायरी’ ही पहिली कथा मुंबईच्या निर्भीड साप्ताहिकात प्रसिध्द झाली.

साहित्यीक जन्मभूमीच्या मातेचे संस्कार घेऊनच मोठा होत असतो. गुरुजींच्यावर कृष्णाकाठच्या ग्रामीण जीवनाचे धनगावच्या मातीचे संस्कार झाले होते. या संस्कारातूनच त्यांचे ग्रामीण कथालेखन बहरले – समरागण, उघडया जगात, एका आईची लेकरु कायापालट, घसरगुंडी या कांदब-या ग्रामीण मराठी साहित्यात मोलाची भर टाकणाया आहेत. गार सावली, अहेव लेणं, पाहुणे, पाझर, कथा जन्माची कथा या कथासंग्रहांनी गुरुजी मराठी साहित्याचे खया अर्थाने अहेव लेणंच ठरले. आपल्या अवती भोवती ग्राम्य जीवनात जे घडते ते गुरुजींनी अनुभवले व त्यातून त्यांची लेखणीही बहरली समाज मनावर परिवर्तनाचे संस्कार करणारे जीवन मुल्यांची रुजवणूक करणारे गुरुजींचे साहित्य या दृष्टीने खया अर्थाने समाजधन आहे.

गुरुजींचे वाड:मय कृषिकेंद्रित वास्तवतेवर खया अर्थाने आधारलेले आहे. उघडया जगात या कांदबरीवर जिवाचा सखा हा चित्रपट निघाला व तो महाराष्ट्रभर गाजला. एकदा भोसले गुरुजींनी गप्पा मारताना प्रश्न विचारला गुरुजी आपण पुण्या–मुंबईत राहून चित्रपटासाठी लेखन का केले नाही त्यावर ते नेहमी म्हणत मला गावच्या मातीची ओढ आहे. ही माती सोडवत नाही असे भोसले गुरुजी कृष्णाकाठच्या समाजजीवनाशी इतके एकरुप झाले होते.

सन 1949 मध्ये गुरुजींनी लिहिलेल्या अहेव लेणं या कथेला महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यांच्या दौलत कथेचा बालभारती पुस्तकात समावेश झाला आहे. समरागण या कथेला कवरेकरांनी प्रस्तावना लिहिताना म्हटले होते की मराठी ग्रामीण कथेतील बिनीचा आवाज म्हणजे भोसले गुरुजी आहेत.

म. भा. भोसले गुरुजी साहित्यिक कथाकार म्हणून जितके श्रेष्ठ आहेत तितकेच ते शिक्षक म्हणूनही आदर्श आहेत. त्यांच्या आचार–विचारातून आदर्श संस्कार घेवून कृष्णाकाठच्या किती तरी पिढया आदर्श घडल्या आहेत. एक लोकशिक्षक समाजशिक्षक म्हणून ते सतत गावासाठी परिसरासाठी झटत असे. त्यांची जीवनशैली आजच्या साहित्यिकांना प्रेरणा देणारी आहे. आचार–विचार उच्चार आणि लेखणी याबाबतीत एकवाक्यता असणारे म. भा. भोसले गुरुजी म्हणूनच मराठी वाड्:मयाचे खरे भूषण आहेत. मराठी ग्रामीण कथेमध्ये गुरुजींच्या कथांचा गुरुजींच्या नावाचा सुवर्णठसा उमटला आहे. गुरुजींचे साहित्य ओढून–ताणून लिहिलेले नाही काल्पनिक नाही. ग्राम्य जीवनाच्या रसरशीत अनुभवाच्या मुशीतून आणि गुरुजींच्या समर्थ चिंतनशील लेखणीतून निर्माण झालेले ते साहित्य आहे. म्हणूनच आज शालेय विद्याथ्र्यांच्या महाविद्यालयीन युवक युवतींच्या हाताला गुरुजींचे वाड्:मय जाने गरजेचे आहे.

म. भा. भोसले मराठी साहित्यात समीक्षकांकडून तसे दुर्लक्षितच राहिले त्यांच्या ‘उघडया जगात’ या कथेला तर सहा वर्षे प्रकाशन मिळाले नाही. पण नंतर कोल्हापूरच्या शनिश्वर प्रेसने कथा प्रसिध्द केली. आणि त्यावरच ‘जीवाचा सखा’ हा चित्रपट निघाला गुरुजींनी हयातीत प्रसिद्धीचा ध्यास धरला नाही आपली नोंदी न घेतल्याची तक्रार कधीही केली नाही. व्रतस्थपणे गुरुजी जीवन जगत राहिले मोठेपणाची हाव नाही. कथांचाही बडेजाव नाही. अत्यंत समाधानी शांत संयमीपणाने गुरुजींनी आपला वाड्:मयीन प्रवास केला आहे.

म. भा. भोसले गुरुजी मराठी शारदेच्या दरबारातील अव्वल दर्जाचे ग्रामीण कथाकार आहेत. समाजप्रबोधनासाठी व समाजमनावर सुसंस्कार करण्यासाठी त्यांनी आपली लेखणी हयातभर लिहिती ठेवली गुरुजी आदर्श शिक्षक आहेत समाजशिक्षक लोकशिक्षक आहेत माणूसपण जपणरे आहेत. समाजाची ‘घसरगुंडी’ ऐकून या समाजाचा कायापालट व्हावा यासाठी झटलेले समाजसेवक आहेत. धनगावची कहाणी लिहून ग्रामीण भागातील लोकांना विकासाचा मार्ग दाखविणारे लेखक आहेत.

कृष्णेचा प्रवाह वाहतो आहे वाहत राहणार आहे. कृष्णाकाठच्या या व्रतस्थ साहित्यिकाने आपले अजोड वाड्:मय समाजासाठी मागे ठेवून कृष्णाकाठीच आता चिरनिद्रा घेतली आहे. म. भा. भोसले गुरुजींचे हे वाड्:मय महाराष्ट्राचे संस्कारधन बनून नव्या पिढीला संस्कार देतच राहणार आहे. अगदी कृष्णेच्या प्रवाहाप्रमाणे कृष्ठाकाठची मने समृद्ध करीतच राहणार आहे.

आबा नाना सावंत–

सावंत गुरुजी म्हणून ते प्रसिद्ध आहेत गावाच्या अनेक विकासकामात त्यांचा सहभाग असतो हनुमान मंदीराच्या जीर्णोद्धाराचा पुढाकार त्याच्यामुळेच झाला. गावातल्या अनेक कार्यासाठी ते सढळ हातोन मदत करतात.

सुनिल शामराव साळुंखे–

सुनिल साळुंखे सध्या धनगांव गावाचे तरुण उपसरपंच आहेत. व्हॉलीबॉल खेळात ते विशेष प्रविण आहेत तसेच भूमिपुत्र या येऊ घातलेल्या चित्रपटाचे ते निर्माते तसेच अभिनेते आहेत राजकारणाबरोबरच त्यांना अभिनयाचीही आवड आहे. ना मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटात देखील त्यांनी एका पत्रकाराची भूमिका साकारली होती ‘मना सज्जना’ या चित्रपटामध्ये सुध्दा त्यांनी मकरंद अनासपुरे यांच्याबरोबर काम केले आहे.

सुनिल विष्णू भोसले–

हे सध्या चित्रपट सृष्टीत सह–दिग्दर्शक म्हणून काम पाहत आहेत ईटीव्ही वरील यंदा कर्तव्य आहे या मालिकेपासून ते दिग्दर्शन क्षेत्रात काम करत आहेत. याच मालिकेतील काही भागाचे लेखन ही सुनिलने केले आहे. ख्यातनाम अभिनेता भरत जाधव यांची प्रमुख भुमिका असलेला नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे या चित्रपटाचे ते सह दिग्दर्शक आहेत. तसेच स्मृती इराणी सोबत ‘स्टार ऑईल’ जाहीरात आणि दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, मधुराणी गोखले, राहुल मेहंदळे यांची प्रमुख भुमिका असलेला ‘सुंदर माझं घर’ या चित्रपटाचेही ते सह दिग्दर्शक आहेत. सुरुवातीला ते काही काळ पुण्याच्या दै. केसरीचे ते उपसंपादक होते.

डॉ. माणिकराव साळुंखे–

पलूस तालुक्यातील कृष्णाकाठच्या धनगांव येथील एका शेतकरी कुटुंबात 5 एप्रिल 1955 चा त्यांचा जन्म घरची परिस्थिती बेताचीच असली तरी त्या कालखंडाच्या मानाने घरचे शैक्षणिक वातावरण उत्तमच म्हणायच धनगावच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले माध्यमिक शिक्षण भिलवडीच्या सेकंडरी स्कूलमध्ये तर पुढील शिक्षण कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजमधून पूर्ण करीत त्यांनी रसायनशास्त्र विषयात पी.एच.डी पूर्ण करीत 1980 पासून कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजमधून लेक्चरर म्हणून शैक्षणिक कार्यास प्रारंभ केला.

त्यांनी इस्त्रायल तसेच अमेरिकेतील नॉर्थ वेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये रसायन शास्त्र विभागातील संशोधक ते शिवाजी विद्यापीठाच्या कुलगरु पदापर्यंतचा प्रवास आत्मविश्वास व जिद्दीने करण्यात ते सदैव आघाडीवर राहिले. कमवा आणि शिका योजना राबविणारे शिवाजी विद्यापीठ भारतातील हे पहिलेच विद्यापीठ.

ग्रामीण भागातील विद्याथ्र्यांपर्यंत शैक्षणिक संधी कशा पध्दतीने पोहोचविता येतील त्यातून तो स्वत:च्या पायावर कसा उभा राहील हा एकच हेतू डोळयासमोर ठेवून डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आजपर्यंत कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरु या नात्याने शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात केलेले काम इतरांसाठी निश्चितय प्रेरणादायी अस आहे. सांगली जिल्हयातील धनगावच्या या सुपुत्राचे हे काम दीपस्तंभासारखे आहे.