राजयकीय व्यक्तिमत्व

राजयकीय व्यक्तिमत्व–

कै. भिमराव(बापू) भोसले–

धनगांव गावाच्या विकासात सदैव अग्रेसर राहिलेले हे व्यक्तिमत्व भिलवडी खालच्या बारा वाडयांचा कारभार त्यांनी सुमारे पंचवीस वर्षे एक हाती सांभाळला. बारा वाडया आणि भिलवडी गाव या सर्वांची एकच गट ग्रामपंचायत त्यावेळी अस्तित्वात होती. या वाडयांच्या आणि भिलवडीतल्या जैन समाजाच्या पाठींब्यावर त्यांनी सलगपणे 15 वर्षे भिलवडीचे आणि 12 वाडयाचे सरपंच पद भूषविले सरपंच पदाच्या काळात त्यांनी अनेक विकास कामे केली भिलवडीतल्या दलितांना हक्काची जागा मिळवून दिली तसेच सदैव भटके जीवन कंठणाया गोसावी समाजासाठी भिलवडी स्टेशन आणि जुळेवाडी येथे जागा देवून त्यांना स्थिर जीवन जगण्यास प्रवृत्त केले. धनगांवात हनुमान विकास योजना व हनुमान लिफ्ट इरिगेशन स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला होता. एक हाती कारभार विकासाभिमुख दृष्टी संघटन, कौशल्य दूददृष्टी आदी गुणांच्या जोरावर त्यांनी जिल्हयात दरार निर्माण केला होता बारा वाडयातून धनगांवाची स्वतंत्र ग्रामपंचायत झाल्यानंतर त्यांनी धनगांवचे सन 9/6/67 पासून ते 5/6/68 पर्यंत सरपंच पदाचा कार्यभार सांभाळला होता.

कै. कृष्णा साळुंखे

अशिक्षित पण दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्व गावातल्या मुलांनी शिक्षण घ्यावे म्हणून ते सतत धडपडत दरवर्षी एक नवा शिक्षक आणायचे ते स्वत:च्या घरातच शाळा सुरु करायचे शिक्षक मुलांनी तसेच बापूंनी दिलेले धनधान्य घरी घेवून येतो असे तो शिक्षक गायब व्हायचा तो परत या आडवळणी गावामध्ये फिरकायचा नाही मग नवा शिक्षक शोधण्याकामी ते लागायचे अशा अवस्थेत बापूंनी काही काळ शाळा सुरु ठेवली. ख-या अर्थाने धनगावामध्ये शिक्षणाचा पाया घातला तो या कृष्णा बापूंनीच.

वकील. विलासराव पवार (हिरुगडे)

धनगांव गावाचे सुपुत्र श्री. विलासराव शंकर पवार हे सांगलीतील जिल्हा सत्र न्यायालयात सह. सरकारी वकील म्हणूक काम पाहत आहेत तसेच त्यांचा जायटंस् ग्रुपच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग असतो.

श्री. सतपाल ज्ञानदेव साळुंखे

हे धनगांव गावाचे माजी उपसरपंच असून त्यांचा अनेक सामाजिक कार्यात सहभाग असतो तसेच ते पलूस तालुक्याच्या समन्वय समितीचे सदस्य आहेत तसेच ते एक सामाजिक कार्यकर्ते आहेत ते गावातील विश्वजीत कदम पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आहेत.

श्री. भास्कर मारुती पाटील

हे धनगांव गावाचे सुपुत्र असून ते सध्या प्रवर अधिक्षक सांगली या पदावर कार्यरत आहेत.