सुविधा

सुविधा–

  • गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. धनगांव ते बुरुंगवाडी रस्त्याचे 3 कि.मी. पर्यंत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण झालेले आहे. गाव आणि वस्त्यांना जोडण्यासाठी खडी आणि मुरुमाचे रस्ते तयार केले आहेत. त्याचप्रमाणे गावामध्ये रस्त्यावर विजेच्या दिव्याची सोय केलेली आहे.
  • नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीने गावामधूनच वाहणाया कृष्णा नदीवरुन पाणीपुरवठा योजना केली आहे. खंडोबाचीवाडीकडे जाणाया रस्त्यालगत गावातीलच आत्माराम साळुंखे यांच्या जागेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम केले आहे. 1 कि.मी. वरुन गावाला पिण्याचे पाणी आणले आहे हे पाणी फिलटर करुन उंचावरील टाकीत साठविण्यात येते त्यानंतर गावाला सकाळ व संध्याकाळी योग्य दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा केला जातो या योजनेची 10 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याची क्षमता आहे.
  • गावची पाणीपुरवठा योजना ही पलूस तालुक्यात सर्वात चांगली योजना ठरली आहे.
  • गावात सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत.
  • गावामध्ये एस.टी खाजगी जीप आणि रिक्षा या दळणवळणाच्या सोयी आहेत. गावामध्ये सांगली धनगांव ही एस.टी रात्री मुक्कामाला येते तसेच गावामध्ये पोस्ट कार्यालय आहे.
  • तसेच दूरध्वनीचे केंद्र गावात असल्यामुळे वाडीवस्तीवरही फोनची सुविधा उपलब्ध झाली आहे. तसेच गावामध्ये एअरटेल कंपनीच्या टॉवर झालेला आहे त्यामुळे मोबाईल धारकांची सोय झालेली आहे.