शैक्षणिक सुविधा

शैक्षणिक सुविधा–

  1. धनगांवच्या वेशीतून आत प्रवेश केल्यानंतर बुरुंगवाडी रोड रस्त्यालगत जिल्हा परिषदेची प्राथमीक शाळा लागते शाळेची इमारत ही पूर्वी कौलारु होते सदर शाळा ही इ. 1.ली ते 7.वी इयत्तेपर्यंत शिक्षण देणारी शाळा आहे. सध्या सर्व शिक्षा अभियान योजनेतून शाळेची नवीन दुमजली आर.सी.सी इमारतीचे काम पूर्ण झाले असून सदरची शाळा ही सध्या तेथे भरते. शाळेच्या चारही बाजूने तारेचे कंपाऊंड आहे.

शैक्षणिक विकासाबरोबरच विद्याथ्र्यांना खेळाची आवड व्हावी यासाठी पुरेशा प्रमाणात खेळाचे मैदान आहे. चौथीच्या स्कॉलरशीप परीक्षेसाठी विद्याथ्र्यांकडून तयारी करुन घेण्यासाठी शिक्षक अथक परिश्रम घेत असतात. त्यामुळेच या शाळेचे विद्यार्थी स्कॉलरशीप परीक्षेत जिल्हयात चमकलेले असतात. विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा पाया मजबूत करण्याचे काम ही शाळा अविरीतपणे करत आहे.


    1. इ. 7.वी नंतर पुढील शिक्षणासाठी भिलवडीला किंवा बुरुंगवाडीला जावे लागते तरी आपल्या गावात पुढील शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने गावातील बुर्जुग मंडळींनी एकत्र येऊन अंकलखोप शिक्षण संस्थेमाफर्त धनगांव गावामध्ये 2002 मध्ये धनेगाव हायस्कूल धनगांव चालू केले. सुरुवातीला पहिल्यांदा आठवीचा वर्ग सुरु केला. त्यानंतर नववी व दहावीचा वर्ग सुरु केला. सध्या गावामध्ये पहिली ते दहावी पर्यंत शाळा आहे. धनगांव हायस्कूल धनगांवाच्या शाळेची इमारत कौलारु आहे. शाळेपुढे रेखीव पध्दतीने झाडे लावली आहेत. शाळेच्या सौदर्यांत भर पडली आहे. धनगांव हायस्कूल धनगावाच्या शाळेची इमारत ही भाडयाची आहे.