आठवडे बाजार

आठवडे बाजार–

गावातील आठवडयाचा बाजार हा शनिवारी भरतो. सदरच्या बाजार हा हनुमान मंदीरासमोर असलेल्या मैदानात भरतो. सदर बाजारामध्ये गावातील व्यापारी लोकांबरोबर बाहेरगावचे व्यापारी मालाची विक्री करण्यासाठी बाजारात येतात. बाजार हा दुपारनंतर भरतो. बाजारात फळे, पालेभाज्या कांदा बटाटा कपडे घरगुती वापरासाठी लागणार भांडी कडधान्य धान्य आदींचा समावेश असतो. खरेदी करण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी असते.