माहिती

पिकांची माहिती–

गावाचा प्रमुख व्यवसाय हा शेती असल्यामुळे शेतीमध्ये बाजरी, ज्वारी, हरभरा, गहू, खपली या पिकाचे क्षेत्र गावामध्ये जास्त आहे. या पिकांबरोबरच कांदे ऊस बटाटा या नगदी पिकांचे उत्पादन जास्त निघते म्हणून शेतकरी या पिकांवर अधिक भर देत आहेत. पाण्याची उपलब्धता जास्त असल्यामुळे टोमॅटो कोथंबीर, कोबी, फ्लॉवर, ढोबळी, मिर्ची, मेथी, भेंडी, दोडका ,कारले यासारख्या भाजीपाल्याचे उत्पादन जास्त प्रमाणात घेतले जात आहे.

फळबागांची माहिती–

गावचा प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळे गावातील शेतकरी हा आधुनिकतेची कास धरणारा आहे. पारंपारिक पिकांबरोबर फळबागावर बळीराजा लक्ष केंद्रीत करु लागला आहे. त्यामध्ये आंबा, नारळ, द्राक्षे पपई इ. फळबागाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे केळीचे सुद्धा उत्पादन घेतले जाते. पुणे मुंबई, बाजारपेठेत फळे पाठविली जात आहेत.