प्राणीसंपदा

प्राणीसंपदा–

धनगाव गावचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे गावात शेतीबरोबर दूध व्यवसाय हा जोडधंदा केला जातो. त्यामुळे गावात गायी व म्हैशीची संख्या जास्त आहे गावामध्ये वस्तीवर दूध संकलन करण्यासाठी दूध डेअरी आहेत दुधाचा पगार हा 15 दिवसाला होत असल्यामुळे बरेच शेतकरी हे या व्यवसायाकडे बहुसंख्येने वळाले आहेत. पलूस तालुक्यात दूध उत्पादनात धनगांव आघाडीवर आहे सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी दूध व्यवसाय हेच प्रमुख उत्पन्नाचे साधन केले आहे. गावात बरेच बैल असून त्यांचा प्रामुख्याने शेतीच्या कामासाठी उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे काही बागायतदार शेतकयाकडे बैलगाडया बैले आहेत. या बैलाची किंमत जवळ जवळ लाखाच्या घरात आहे. बयाच प्रमाणात शेळया मेंढया सुद्धा गावामध्ये आहेत गावात व्यावसायिक दुष्टिकोनातून कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला जाते आहे.