स्वच्छता

स्वच्छता–

  • स्वच्छतेसाठी नेहमीच गाव आग्रही असते संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात गावाने सातत्याने सहभाग घेतला आहे.
  • ग्रामपंचायतीच्यावतीने वेळोवेळी गावात स्वच्छता मोहिम राबविली जाते. धनगांव गाव हे कृष्णा नदीच्या काठी वसले असल्यामुळे पावसाळयात नदीला पूर येतो. पुराचे पाणी गावात शिरते त्यामुळे सर्वत्र गाळ व घाण पसली जाते. पाणी उतरल्यानंतर गाळ व घाण काढण्यासाठी ग्रामपंचायत विशेष मोहीम राबवते.
  • पावसाळयात डासांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी औषध फवारणी व धुर फवारणी केली जाते.
  • नागरिकांना पिण्याच्या पाण्यातून पावसाळी आजराची लागण होऊ नये यासाठी मेडीक्लोरच्या बुदल्याचे वाटप केले जाते.
  • पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाया टाकीमध्ये टि.सी.एल चा वापर केला जातो.
  • गावातील गटारी स्वच्छ करुन गटारीकडेने फॉलिडॉन पावडर टाकली जाते.
  • जि. प्राथमिक शाळा धनगांव आणि धनगाव हायस्कूल या शाळेतील विद्यार्थी वेळोवेळी परिसराची स्वच्छता करतात.
  • तसेच ग्रामस्थ ही स्वच्छता मोहीमेत सहभागी होतात व गावातील व घरासमोरील परिसराची स्वच्छता करतात.