जलस्त्रोत

जलस्त्रोत–

कृष्णा नदीच्या काठावर धनगांव हे गाव वसलेले त्यामुळे नैसर्गिकच निसर्गाचा वरदहस्त लाभलेला आहे. गावातून कृष्णा नदी वाहते. या नदीवर हनुमान लिफ्ट इरिगेशन स्कीम द्वारे शेतीला पाणी पुरविले जाते. या नदीच्या पाण्याचा फायदा आजूबाजूच्या परिसरातील शेतीसाठी होतो. त्याचबरोबर गावात जवळ जवळ 100 जणांच्या स्वत:च्या पाणीपुरवठा पाईप लाईन आहेत. सदर पाईप लाईनद्वारे शेतीला पाणी पुरविले जात त्यामुळे शेतीसाठी 12 महिने जलसिंचनासाठी सोय उपलब्ध असल्यामुळे गाव हिरवेगार आणि धनधान्याने समृध्द असे आहे.

गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी ग्रामपंचायतीने कृष्णा नदीवरुन स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना केली आहे. पलूस तालुक्यातील सर्वात चांगली पाणीपुरवठा योजना म्हणून तिचा नावलौकिक आहे. 10 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्याची क्षमता आहे. सदर पाणीपुरवठा योजना ही डब्बल फिलटर प्लॅन्टची आहे.